भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह नाशिक ते मालेगाव केला बस प्रवास केला. महिलांना बसमध्ये ५० टक्के तिकिटावर सवलत दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी बसने प्रवास करून आनंद व्यक्त केला. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातून त्यांनी हा बस प्रवास सुरू केला. तत्पूर्वी बस स्थानकात महिलांना पेढे वाटून सरकारने केलेल्या या घोषणाचा केला आनंद व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी '५० टक्के... महिला ओक्के' असा नाराही लगावला.